प्रिय,
तुला पत्र लिहायला बसलेय खरी, पण शब्दांपलीकडल्या भावनांना शब्दांत चपखलपणे उतरवायच कसब नाही जमत मला तितकस अजून. मग वाटत, लिहू का नको, कारण जे म्हणायचय ते नेमक उतरल नाही तर काय अर्थ राहिला... पण तशी चिंता नाहीच मला, कारण सगळं समजेलच तुला, न बोलता आणि नेमक न सांगता आल मला, तरीही. तशीही कधी पत्र ही लिहायची गरज भासलीच नाही आपल्याला. तुला वाचता येत माझ मन, तुझ्यासमोर असले काय न नसले काय, अंतर कितीही असल तरी काहीच फरक नाही पडत तसा. आत्ता याक्षणी देखील एकमेकांपासून खूप लांब असलो तरी, एकमेकांच्या मनांत काय चालत असेल हे लक्षात येतच आपल्या. उगाच शब्दांच गालबोट तरी कशाला??
तसही, आपल्यात शब्दांचा आधार शोधणारी मीच. तुला त्यांची कधी फ़ारशी असोशी नसतेच. प्रत्येक गोष्ट शब्दांत मांडायलाच हवी का, हे तुझा नेहमीचाच प्रश्न. कमीत कमी शब्द वापरण लॉजिकल आहे, अस वरून आग्रही मत, आणि ते मांडायचा अन माझ्याकडून मान्य करवून घ्यायचा अट्टाहासही, जोडीला एक मिश्किल हसू. माझी सपशेल शरणागती तिथेच ठरलेली. पण हे लॉजिक, मी शब्द नाही वापरले तर कुठे पळून जात, हे आजत गायत मला समजलेल नाही, बघ!! तुला समजलय का रे??
भेटलो ना , तेह्वाच लक्षात आल होत माझ्या, की लांब राहिलेलच बर, कारण एकदा गुंतलो की परत त्यातून पाय सोडवण जमणार नाही, निदान या जन्मी तरी नाहीच, मग जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी फारसा फरक नाही पडणार! कितीही व्यस्त असलो अन कितीही जणांच्या घोळक्यात असलो तरी, हळूच एकदा नजर सर्वांच्या नकळत भिरभिरेल, तुझ अस्तित्व शोधायला. कान आसुसतील, ओळखीचा आवाज ऐकायला आणि मन तर कधीचच सुटलेल असेल हातातून, वावरत असेल तुझ्याच अवती भवती. आणि एवढ होऊन देखील सार्या गर्दीत मी नसतेच एकटी. माझ्या सोबतीला तुझ्या मनाचा एक कप्पा आहेच. कधी नव्हे ते बोलून दाखवलस, आणि एकदा मला समजावलस, एखाद्या रुसलेल्या लहान मुलीला समजवाव तस्सच अगदी..........
आठवत का रे तुला? किती आणि काय काय... जणू काही सार्या आयुष्याचा धांदोळा घेतलास, आणि सारी बेरीज वजाबाकी झाल्यावर लक्षात आल दोघांच्याही, की हे काही खर नाही गड्या, एकमेकांसोबत चालताना, दोघांचीही फरफटच होणार आहे सतत, एक तर एकमेकांची फरफट करायची नाही तर सभोवतालच्यांची. दोघांनाही मान्य नसलेला पर्याय! तू हताश, माझ्या डोळ्यांतून अगतिकता वहायला लागलेली...... सार काही बोलण्यापलीकडे पोचलेल.
मग म्हणालास, ठीक आहे, परत कधी सांगता येईल, न येईल म्हणून सांगतोच आता, "माझ्या आयुष्यात तुला, फक्त तुलाच, ध्रुवाच स्थान आहे. आयुष्यं समांतर वाहतील आता, आणि वहायलाही हवीत, स्वत:साठी नाही तरी इतरांसाठी, तसाही फक्त आपलाच हक्क कुठे असतो आपल्यावर? पण मी आहेच. कधीही हाक मारलीस तरी इथेच आहे. तुलाही ठाऊक आहे ना, मी ही तुझ्यासाठी सतत इथेच आहे?? "
प्रिय, त्या दिवशी मलाही हेच सांगायच होत, पण शब्दच वाहून गेले... नाही तरी प्रत्येक गोष्ट शब्दांत सांगायला हवी असा थोडाच नियम आहे? जाणून आहेसच की तू देखील, की मीही सतत तुझीच आहे.....
माझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही!
December 2, 2007
December 1, 2007
सांगा! आता काय कराल?
मित्र दारात येतो, घरात येत नाही,
मित्र बोलत राहतो.... कळू देत नाही,
मित्र ओळख नाकारतो दिवसाच्या कोलाहलात,
मित्र आठवण नाकारतो रात्री एकटं
मित्र शत्रूसारखाच होत जातो दिवसागणिक....
आणि पूर्ण विचारांती, नाही आवेगात क्षणिक.
दु:ख त्याचे खरे, नुसत्या दुराव्याचे नाही,
असूयेचे गाणे म्हणे असेच जन्म घेई
अशा मित्रास तहान लागेल सहवासाची, तो दाबेल,
अशा मित्रास जायचे असेल पुढे पुढे, तो जिंकेल,
अशा मित्रास तुम्हीं द्याल हिरवा चारा, तो फसणार नाही,
मित्रासाठी व्हाल तुम्हीच निवारा, तो थांबणार नाही
तो चालत सुटेल अशा वेगात,
की तुम्ही ऐलतीराशी तर तो क्षितिजापार,
जाताना नेईल तुमचे असे एकच गाणे,
की तुम्ही निराधार.... तर तो निर्विकार
मित्र जसजसा होत जाईल शत्रू, तसे तुम्ही काय कराल?
मित्र ओळख नाकारेल.... दुखावले जाल, पण मग घ्याल समजुतीने.
मित्र आठवण नाकारेल एकांतातही... हराल तुम्ही समग्रतेने.
मित्र जाऊ लागेल क्षितिजापार, तुम्ही हसाल नुसते
आणि क्षितिजापार असलेल्या लाटेवर, मित्रावर
उतरेल दिवस-रात्रीच्या पलीकडची सायंकाळ,
आणि मग जेह्वा मित्र हलेल, हरेल,
बोलावेल तुम्हालां पुन्हा एकदा,
कवळेल तुम्हांला पुन्हा एकदा,
अशा बोलीत, की जणू हीच तुमची पहिली भेट!
मित्र बोलत राहतो.... कळू देत नाही,
मित्र ओळख नाकारतो दिवसाच्या कोलाहलात,
मित्र आठवण नाकारतो रात्री एकटं
मित्र शत्रूसारखाच होत जातो दिवसागणिक....
आणि पूर्ण विचारांती, नाही आवेगात क्षणिक.
दु:ख त्याचे खरे, नुसत्या दुराव्याचे नाही,
असूयेचे गाणे म्हणे असेच जन्म घेई
अशा मित्रास तहान लागेल सहवासाची, तो दाबेल,
अशा मित्रास जायचे असेल पुढे पुढे, तो जिंकेल,
अशा मित्रास तुम्हीं द्याल हिरवा चारा, तो फसणार नाही,
मित्रासाठी व्हाल तुम्हीच निवारा, तो थांबणार नाही
तो चालत सुटेल अशा वेगात,
की तुम्ही ऐलतीराशी तर तो क्षितिजापार,
जाताना नेईल तुमचे असे एकच गाणे,
की तुम्ही निराधार.... तर तो निर्विकार
मित्र जसजसा होत जाईल शत्रू, तसे तुम्ही काय कराल?
मित्र ओळख नाकारेल.... दुखावले जाल, पण मग घ्याल समजुतीने.
मित्र आठवण नाकारेल एकांतातही... हराल तुम्ही समग्रतेने.
मित्र जाऊ लागेल क्षितिजापार, तुम्ही हसाल नुसते
आणि क्षितिजापार असलेल्या लाटेवर, मित्रावर
उतरेल दिवस-रात्रीच्या पलीकडची सायंकाळ,
आणि मग जेह्वा मित्र हलेल, हरेल,
बोलावेल तुम्हालां पुन्हा एकदा,
कवळेल तुम्हांला पुन्हा एकदा,
अशा बोलीत, की जणू हीच तुमची पहिली भेट!
.... तेह्वां काय कराल?
सांगा! तेव्हां काय कराल?
( ही कविता मी २००७ च्या साधना दिवाळी अंकात वाचली आहे. डॉ. आशुतोष जावडेकर यांची कविता आहे.)
गूढ अशा एकांती
या गूढ अशा एकांती,
मज तुझी आठवण येते,
मी परत एकदा जगते,
क्षण सारे तुझे न माझे
नजरेची जगलो भाषा,
स्पर्शांची होती गाणी,
ती अनवट वेडी धुंद,
जी अजून वेढूनी राही
तू दूर आता, जणू स्वप्न,
माझ्या आकाशीचा चंद्र,
जो असून गवसत नाही,
तरी संगत अक्षय आहे
या गूढ अशा एकांती,
मग तुझी आठवण येते......
मज तुझी आठवण येते,
मी परत एकदा जगते,
क्षण सारे तुझे न माझे
नजरेची जगलो भाषा,
स्पर्शांची होती गाणी,
ती अनवट वेडी धुंद,
जी अजून वेढूनी राही
तू दूर आता, जणू स्वप्न,
माझ्या आकाशीचा चंद्र,
जो असून गवसत नाही,
तरी संगत अक्षय आहे
या गूढ अशा एकांती,
मग तुझी आठवण येते......
Subscribe to:
Posts (Atom)