मायबोलीतर्फे गझल कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ह्या कार्यशाळेत मी भाग घेतला होता. कार्यशाळेबद्दल इथे वाचता येईल.
असे भोगले, राहिली आस नाही
सुखे सोसले, मानला त्रास नाही
मनी कोंडला, सूर बेभान वेडा
असो बेसुरा! कोरडा खास नाही
जरी दु:ख दाटे, उरी भंगल्याचे
कुणा हाक देईन, हा ध्यास नाही
किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही
असा होतसे प्राण श्वासांत गोळा
तरी साहिले, सोडला श्वास नाही
कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही
5 comments:
nice..
@लेट्स कीप इट : धन्यवाद.
कमलदलापरी, अलिप्त केवळ
काव्य तुझे हे, तरे भवावर
अस्सल अनुभव, व्यक्त तसे अन
खरी प्रकटते, सादही त्यातून
- छानच आहेत विचार. आणि त्यापाठच्या भावनाही.
किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही
खास.
कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही
नेमका समारोप.
मध्ये अजून थोडी सफाई हवी.
सुंदर गझल... पण एकच का? अजून येऊ द्यात की... गजल मला खूप आवडते... सुरेशभट.इन वर तर खजिना आहे सुरेशजींच्या गजलांचा
Post a Comment