September 23, 2007

वेदना..

.. अन असे दाटूनी येते
सांजवेळी डोळां नीर
निसटल्या काही क्षणांचे
उरी विंधणारे शर

...असेच आवडलेले काही....

नव्हती ती रक्तामधली
ओढाळ असोशी
पटेल का तुज,
ओठ निग्रही
स्तब्ध जाहले पेल्यापाशी...

नीरव पहाट

तोच चन्द्रमा नभात......अंतर

तुझ्या नि माझ्या वाटा,
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खर तर,
पण मिटत नाही अंतर