January 29, 2008

मैत्रीचं परिमाण

आजकाल मैत्रीला परिमाण तरी काय वापरतात? आजकालच्या मैत्रीची व्याख्या मला नक्कीच समजत नसावी, याची आता मला खात्री वाटायला लागलीय....

मैत्री म्हणजे नुसत एकमेकांशी गोड गोड बोलणं, एकमेकांच्या हो ला हो करणं बनलय का? आपल्या मित्र मैत्रीणीच काही चुकत असेल तर त्यांना हे चुकतय अस सांगायचा अधिकार इतर मित्रांना नसतो का आजकाल? का, केवळ चूक झालेली व्यक्ती आपल्या मित्रगणात मोडते म्हणून चुकलेली कृती, बोलणं याच्याकडे डोळेझाक करायची? अस काही घडलच नाही अश्या थाटात हसत, बोलत अन वागत रहायच?प्रसंगी कान पकडून चुकीची जाणीव आपल्या मित्राला करून द्यायाची मुभा आजकालच्या मैत्रीच्या व्याख्येत बसत नाही का?

प्रत्येकाशी मैत्री जमत नाही - निदान मला तरी नाही। बहुतेक सर्वांशी हसून खेळून वागल तरी, मैत्रीचे धागे एखाद्याच व्यक्तीशी जुळतात, हो ना? आणि हे अस लोभसवाणं मैत्र जुळलय हे समजल्यावर, आणि कालपरवापर्यंत ह्या मैत्रीविषयी अत्यंत आत्मीयता बाळगून असलेली व्यक्ती, मैत्री वार्‍यावर भिरकावून द्यायला तयार होते, नव्हे, भिरकावते - केवळ स्वतःचा 'मी' जपायला? अस करू शकत का कोणी? मैत्री अशी असते? एक मित्र म्हणून, मी चूक दाखवून देणं मला इतक महागात पडणार आहे?

माझा एक मित्र आहे, अगदी सवंगडी कॅटेगरीमधला, की आता 'होता' अस म्हणू? :( आजपर्यंत आम्ही एकमेकांबरोबर खूप काही शेअर केलय, खूप गप्पा मारल्यात, खूप काही सांगितलय। आवडी निवडी, इच्छा, आकांक्षा, तत्वं सार सार काही. अगदी एखादी मुलगी ह्याच्या रडारवर रजिस्टर होते, तेह्वाही आधी मलाच कळत, निदान आजपर्यंत कळलय अस म्हणू आपण. खूप जवळचा मित्र. त्याच काही तरी सणसणीत चुकल, आणि ते त्याला मी जाणवून दिल, म्हणून त्याने माझ्याशी बोलणच टाकलय बरेच दिवस. त्याची चूक होती, जेव्हा त्याला तस लक्षात आणून दिलं तेव्हा त्याने ते मान्य केल, सॉरी म्हटल आणि मीही जाऊदेत रे, कळल ना तुला, म्हणत माझ्याकडून विषय संपवला. माझ्याकडून विषय संपला होता. संपायला पण हवा ना? अर्थात हे माझ मत.

दुसर्‍या दिवसापासून हळू हळू लक्षात आल की हा पठ्ठ्या बोलतच नाहीये माझ्याशी!! अर्थात माझही चुकलच की जेह्वा लक्षात आलं तेह्वाच त्याला विचारायला हव होत की ही काय आता नवी नाटकं म्हणून.... पण तेह्वा मलाही राग आला होता.... असेच आता काही दिवस उलटलेत. काल शेवटी मीच विचारल त्याला, हे काय चाललय आणि अजून किती दिवस नाही बोलणार अस, म्हणून, तर म्हणे, मला माहीत नाही, बघू.....

हे बरय म्हणजे... :( :( :( अशी असते का मैत्री??? काहीच वाटल नाही का याला अस वागताना?? आम्ही अजूनही बोलत नाही आहोत.....

मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया,सुना हैं की तू बेवफा हो गया.......

ही मैत्री मी गमावली का कायमची?? :(

11 comments:

आशा जोगळेकर said...

असे लोक आपले मित्र नव्हतेच म्हणून सोडून
द्यायचं झालं.

Yashodhara said...

नाही, नाही आशाताई, अशी थोडीच मैत्री विसरून जायची असते? आणि तो तसाच चक्रम आहे जरासा, येईलच पण :) कोणी नवं रजिस्टर होऊदे रडारवर!! मग हम हैं और वो हैं!!!! :D

HAREKRISHNAJI said...

हे भगवान मुझे दोस्तोसें बचाकर रखना
दुस्मनोंकी खबर मै खुद ले सकता हु !

सर्किट said...

अहो क्रिष्णाकाका, यशोधरा जैसी दोस्त जिसके पास है उसे दुष्मनोंकी क्या जरूरत? ;-)

Yashodhara said...

हरेकृष्णाजी :)

सर्किटल्या फर्किटल्या, माझ दु:ख मी इकडे ब्लॉगवर बोलून दाखवतेय, आणि तू माझ्या दु:खावर अश्या डागण्या द्याव्यास!!! शोभत का हे तुला??? आँ??? तू माझ्या मित्राच्याच जातकुळीतला दिसतोस!!!! कुजका!!! :P:D
उगाच जास्त बोललास ना तर कविता लिहीन हो इकडे!!! :D

सर्किट said...

चला, भा.पो. ना? मग झालं! ;-)
टेक लाईट!

Yashodhara said...

सर्किट: चिंता नसावी, एकदम लाईटच घेतलय :) येत रहा. तुलाही तेच सांगायचे होते, मी मजेतच लिहीलं होतं :)

Parag said...

Chan lihilays.. Ase anubhav yetat khare adhe madhe.. faar seriously ghyache nahit.. hotat halu halu resolve.. :)

Yashodhara said...

धन्यवाद पराग, चांगली मैत्री गमावणं जीवावर येत नं पण? होपफुली तस नाही होणार..... :)

संदीप चित्रे said...

काल शेवटी मीच विचारल त्याला, हे काय चाललय आणि अजून किती दिवस नाही बोलणार अस, म्हणून, तर म्हणे, मला माहीत नाही, बघू.....
-------------
इतक्या ह्क्कानं फक्त आपल्या एखाद्याच मित्राला / मैत्रिणीला सांगता येतं… थोडा वेळ जाऊ दे…बस्स :)

Atul Yadav said...

Am in Same Situation...Differnece is I made a mistake...I commited that Mistake...But She is not Talking with Me...and like you 2..We are also Best of Friends :)