February 7, 2009

स्वतःच्या ब्लॉगवरील छायाचित्रंस्वतःचा ब्लॉग असलेलं बरं असतं, हे मला परत एकदा नव्यानं उमगलंय! :D आपल्या ब्लॉगवर काहीही वेडंवाकडं लिहा अथवा फारशी उत्तम वा अतिउत्तम नसलेली अशी चित्रं वा छायाचित्रं टाका! काहीही करा! तेह्वा हे अजून एक छायाचित्र! आजच एकीकडून माझे फोटो भलतेच बेक्कार आहेत व ते मी उगाच का प्रकाशित करतेय वगैरे बरंच ऐकायला मिळालं. नेहमीसारखेच आहेत, काही वेगळेपणा नाही आहे त्यांच्यामध्ये, करायचेच म्हणून करतेय का वगैरे आणि तत्सम बरंच काही..... एकीकडे मजाही वाटत होती! राग आला का? खरं सांगायचं, तर नाही आला. फारसं काहीच नाही वाटलं..असो. खरच इतके बेक्कार आहेत का? असतीलही.

मी म्हणते, असेनात का बेक्कार! मला आवडलेत ते काढताना. मला ते जसजसे कॅमेरात बंदिस्त करायला सापडत गेलेत, ते सगळे क्षण मी खूप मनापासून एंजॉय केलेत. मग त्यांवर पिकासा, फोटोशॉप वगैरे मध्ये काम करताना मला खूप आनंद मिळालाय. ते फोटो पहायलाही मला छान वाटत. माझ्या कष्टांचे आहेत ना ते! तर, मी ते माझ्या ब्लॉगवर आणि जिथे म्हणून माझं म्हणून हक्काचं असं ब्लॉगचं पान आहे तिथे ते मी टाकणारच!

माझ्या असलेल्या ब्लॉगवर आणि माझ्या हक्काच्या पानावर मी काढलेली छायाचित्रं प्रकाशित करायचा मला पूर्ण हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!! :D हे सगळं पण लिहिलंय म्हणजे काय, असंच, माझ्या ब्लॉगवर लिहायचा मला हक्क आहेच! म्हणूनच.. ;)

टीका करा, कोणत्याही शब्दांत करा, पण ती किती मनावर घ्यायची हे मीच ठरवणार ना? :)

5 comments:

Anonymous said...

हे सगळ्यांच्याच सर्व लिखाणाला applicable आहे...
कोणी वाईट म्हटलं तर म्हणू दे..

इतके स्पष्टीकरण का>>>??

नवीन फोटो टाकण्यात हाच वेळ घालवला असता तर तू (जिला हे करायला मनापासून आवडते) ती आणि किमान काही लोक ज्यांना फोटो आवडले, ते अजून सुखी झाले असते..

कलाकारानं टीकेला उत्तर म्हणून फक्त अजून काम करायचं असतं...

keep it up....keep enjoying...

HAREKRISHNAJI said...

कोणाचि शामत आहे टिका करण्याची ?

गाढवाला गुळाची चव ती काय ?

श्यामली said...

पण ती किती मनावर घ्यायची हे मीच ठरवणार ना? >>>:)ghech manaavar :D

यशोधरा said...

vicharjhara, khara ahe tumhee mhanataa tehee, pan kadhe kadhee vaaitpan vaatatach kee.. aso. tumacha salla lakshaat thevin.

krushnakaka, thank you :)

shyamale, hehe :D

Anonymous said...

किती साधी गोष्ट असते परंतु एखाद्या व्यक्तीच्या लेखणीतून ती किती अमूल्य होते.
याचे एक सुंदर उदाहरण मला मिळाले.
अनेक शुभेच्छा !

जहीर सय्यद