January 18, 2009

एक चित्र

हे चित्र कसे काढले अशी विचारणा काही जणांनी केली होती, तेह्वा जे उत्तर दिले होते, तेच इथे डकवते.

खास असं काही वेगळी पद्धत वापरुन वगैरे मी चित्र काढलेलं नाहीये. सहज हातानेच काढलय मायक्रोसॉफ्ट पेंट वापरुन, आणि भरपूर खोडाखोडी वगैरे करुन! आधी ग्रे रंगाची बॅकग्राउंड करुन घेतली. मग त्यावर केलय. तसं शेडींग सोपं पडेल असं वाटलं, आणि ते तसं सोपं पडलंही. चित्र काढताना - म्हणजे काढण्यासाठी झूम करुन घेतले होते. ग्रे बॅकग्राऊंडवर मग काळा आणि पांढरा रंग वापरला. झूम वरुन नॉर्मलला आणल्यावर लहान झाले आहे चित्र खूपच. म्हणून इथे थोडे मोठे करुन टाकले, ते थोडे ब्लर झाल्यासारखे वाटते. मला वाटतं की ग्रे रंगाच्या वापराने तसे वाटत असावे...


5 comments:

जोधा said...

यशोधरा,
अग तुझे लेखन जसे प्रभावी आहे तसेच तु चित्र ही छान काढते.

छान काढले आहेस ग.

Yawning Dog said...

बहिणाबाई :)

कोहम said...

apratim....hatane chitra kadhanaryancha kautuk ahech pan MS paint vaparun kadhanaryancha ajunach jasta ahe

राज जैन said...

वा वा तु तर एकदंम पेंन्टर झालीस :)

छान चित्र... डोळे तर मस्त !


* पेंन्टर... एमएस पेंट वापरलास म्हणून :)

यशोधरा said...

जोधा, YD, कोहम, राजजी, सार्‍यांचे खूप धन्यवाद.