May 10, 2009

निवडुंग

निवडुंग वा तत्सम प्रजाती म्हटलं की सहसा काटेरी वनस्पती डो़ळ्यांपुढे येते. ह्या वर्गात मोडणार्‍या काही वनस्पती मात्र अत्यंत देखण्या दिसतात.

अश्याच एका झुडुपाचं प्रकाशचित्र टिपायचा केलेला प्रयत्न.

कोमेजतो कधी का निवडुंग कुंपणाचा,
फुललो जराजरासा, गळणार मी कितीसा..
-अभिजीत

मूळ गझल इथे पहा.

5 comments:

a Sane man said...

छान दिसतंय हे. पण एक कुतूहलः ही एवढी गडद काळी चौकट का?

यशोधरा said...

काही खास कारण असं नाही. करुन पाहिली, आवडली, म्हणून ठेवली. पांढरीही करुन पाहिली, पण ती आवडली नाही. चौकटीची इंटेंसिटी कमी केली तर एवढं खास असं वाटत नाही. काही वेगळं सुचत असेल तर सांगा, मी करुन पाहीन. :)

गडद काळ्या चौकटीतून काही गूढरम्य संदेश वगैरे दिलेला नाहीये!!!:D :D

a Sane man said...

:D गूढ वगैरे नाही. जरा फिकट छान वाटली असती का काय असं वाटलं. तो प्रयोग करून पाहलाय आधीच म्हटल्यावर प्रश्न मिटला. नि अहो जाहो काय एकदम!

यशोधरा said...

>>नि अहो जाहो काय एकदम!

गलतीसे मिश्टेक! :)

भानस said...

सही!!!