May 17, 2009

प्रार्थना

मी छंद वापरुन याआधी कधी लिहिले नाही. हा एक छोटासा प्रयत्न. जाणकारांनी काही चुका असल्या तर जरुर दाखवून द्या, अशी विनंती.

नाही रे अपेक्षा
देशील दर्शन
मनात जपेन
रुप तुझे..

चराचरी तुझे
प्रकटते रुप
कैसे अपरुप
दिसतसे...

तापलेल्या जीवा
उटी चंदनाची
तुझ्या आठवाची
माव तैसी...

शब्दकळा सरे
सरली जाणीव
उरते नेणीव
सावर रे...

10 comments:

Yawning Dog said...

भक्तिकविता छान आहे - एकदम अभंग वाटतो जुना एखादा.
कुठला छंद आहे हा? ६-६-६-४ एवढेच कळाले.
आणि "माव तैसी..." चा अर्थ काय?
प्रश्नांच्या भडिमाराबद्दल सॉरी.

यशोधरा said...

वायडी, मी देवद्वार छंदात लिहायचा प्रयत्न केला आहे. मिपावर ह्याबद्दल धोंडोपंत ह्यांनी लिहिलेलं वाचलं होतं. तिथे ह्याबद्दलचे विवेचन आले आहे. मिपावर छंदशास्त्र ह्या विभागामध्ये सापडेल. माव हा शब्द मी प्रथम श्रीसाईचरित्रात वाचलाय. याप्रमाणे,

जया मनी जैसा भाव| तया तैसा अनुभव| दाविसी दयाघना| ऐसी तुझी ही माव ||

मी तरी इथे ह्याचा अर्थ, किमया/ परिणाम अश्या अर्थी घेतला आहे, आणि तसाच वापरला आहे.

अ‍ॅनॉनिमस, तुम्ही स्वत:च्या खर्‍या नावाने/ आयडीने न लिहिल्याने तुमची कमेंट प्रकाशित करत नाही. एवढीही हिंम्मत नसेल तर अभिप्राय द्यावे कशाला? अभिप्रायामधला काही भाग, भाषा खटकली, हे अजून एक कारण.

प्रशांत said...

मस्त जमली आहे कविता.
६६६४ आणि दुस-या व तिस-या ओळींचं यमक या गोष्टी तर चांगल्या जमल्या आहेतच, पण तसं करताना कवितेचा भावही अगदी सहजपणे उतरला आहे.

यशोधरा said...

प्रशांत, खूप धन्यवाद.

Abhi said...

छान जमली आहे :)

vijay kumar sappatti said...

hi

i visited first time on your blog .

This is really one of the great work , i came across. I really liked this poem. I enjoyed it .

mala jaast marathi nahi yete , par mala samajhto ,as I am from Nagpur.

thanks . Please visit my poem blog to read new poems : www.poemsofvijay.blogspot.com

regards

vijay

यशोधरा said...

अभि धन्यवाद :)
विजयकुमारजी, आपका धन्यवाद :)

रमण ओझा said...

आपले लिखाण उत्तम आहे. लिखाण आशयसंपन्न असते आणि मांडणी करताना ती लालित्यपूर्ण होवून येते. माझ्या आपल्या लिखाणास शुभेच्छा !

यशोधरा said...

धन्यवाद ओझाजी.

आशा जोगळेकर said...

सुंदर अभंग यशोधरा, अभिनन्दन !