October 7, 2007

बाथ - राजघराण्याच स्नानगृह


बाथमधल बाथ
इंग्लंडच्या वास्तव्यात 'बाथ' नावाच्या गावी जायचा योग आला, तिथे पूर्वी राजघराण्यातल्या लोकांसाठी बांधलेले गरम पाण्याचे, जिवंत झरे असलेले स्नानगृह बघायला मिळाले, तिथला हा फ़ोटो.

राजघराण्यातल्या स्त्री पुरुषांसाठी बांधलेल्या या स्नानगृहात, जलक्रीडेसाठी, ब्रिटिश राजघराण्यातले लोक येत असत ... गावाच नाव ही बाथच. अतिशय सुरेख अस हे गाव आहे.... स्नानगृह अगदी बघण्यासारख आहे, पाणी उबदार आणि वर येतात त्या वाफाही आसमंत उबदार बनवतात ...
पाणी उकळत गरम नसत, शरीराला सोसवेल इतपतच, पण आता पाण्यात उतरायला कोणाला परवानगी नाही, अगदी राजघराण्यातल्या लोकांना पण. खूप छान जतन केले आहे हे स्नानगृह, असे काही पाहिले की आपल्याकडची या बाबतीतली उदासीन वृत्ती जाणवून अगदी खिन्न व्हायला होत...

2 comments:

Anonymous said...

फोटो इतका छान आलाय की माझ्या सारख्याला सुद्धा आत्ताच्या आत्ता आंघोळ करायची इच्छा व्हावी! :-)

यशोधरा said...

अभिजीत, LOL!! :)