December 8, 2007

मी ब्लॉगतेय!!

मागच्याच एक पोस्टमधे मी म्हटलय ना, मला दाट शंका येतेय की मी ब्लॉग जंकी बनत चाललेय म्हणून?? आता ती शंका खात्रीत बदललेली आहे! अगदी खात्रीच झालीये माझी, शंभरच काय हजार टक्के, की मी एकदम अव्वल दर्जाची ब्लॉग जंकी बनलेय म्हणून!!

जेह्वा सुरुवातीला एक मित्राने सुचवल की ब्लॉग बनव स्वत:चा वगैरे, तेह्वा मी अगदी खोडूनच काढल त्याला!! छे, छे, मला नाही जमणार वगैरे!! तशी जरा निरुत्साहीच होते या सगळ्या प्रकरणाबद्दल. मग जेह्वा त्याने ठरवलच अगदी, की माझा ब्लॉग असायलाच हवा, तेह्वा, हो, हो केल आणि थोडेफ़ार कष्ट घ्यायचा प्रयत्न केला!! :P

म्हणजे ते टेंप्लेट निवडण वगैरे, वगैरे… तपशिलात जात नाही कारण, सगळ्यांनाच माहीत आहे काय काय कराव लागत ते… :P हे सुरुवातीचे कष्ट घेणे प्रकार जरा वैतागवाणा. आणि मी जऽऽऽराशी(च) आळशी आहे, त्यामुळे, हे असे कष्ट कोण घेणार, हे एक मोठ्ठ प्रश्न चिन्हच! आणि ही सगळी पूर्वतयारी संपली की मग, लिहायला सुरुवात करायची!! फारच लांबचा पल्ला होता!!

पण मित्र तारी, अन ब्लॉग सुरु करण्यातही मदत करून देई!! नंतरच्या बर्‍याच छोट्या, किचकट अन महत्वाच्या गोष्टी या माणसान अगदी न कंटाळता केल्या. किती आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, पण त्याला नाही आवडणार, म्हणून, इथे एका वाक्यात मनापासून मानतेय. अगर तुम नहीं होते तो मेरा ब्लॉग नहीं होता!! :P

आणि मग, पोस्टायला सुरुवात केली, मिळणार्‍या कमेंट्सनी पण उत्साह वाढत गेला, आणि मंडळी वाचतात आपण लिहिलेल, ही भावना पण सुखावणारी तर खरीच. आता हा उत्साह किती दिवस टिकतो ते बघू!! तो भाग अलाहिदा!! सध्ध्या तरी हे सगळ मी मस्त एंजॉय करतेय.

आता यात कसला आलाय जंकीपणा अस वाटतय का तुम्हांला?? तर तस नाहीय, मी सध्ध्या इतर ब्लॉगही खूप वाचते, ते ही नॉर्मल आहे, म्हणता?? पण माझ नुसते पोस्ट्स वाचूनच समाधान नाही होत आताशा, मला त्यावर पडणारे कमेंटस पण वाचायचे असतात आणि आता तर आधी कमेंट्स वाचून, कमेंटमधे काय लिहिलय ते कळाव, त्याचा अर्थ लागावा म्हणून मी पोस्ट्स वाचते!!

बोला आता!!

6 comments:

सर्किट said...

कूल..
सही उत्साहाने लिहीतेयेस. इकडे आमचे एकेक बुलंद बुरुज ढासळत असताना तुझा हा ब्लॉग ढोणी / पठाण सारखा यंग ब्लड दिसतोये. :) कीप इट अप!

Abhijit Dharmadhikari said...

आम्हा वाचकांच्यावतीने सुद्धा तुला मदत करणा-या मित्राचे आभार मान! कारण मग आम्हाला छान छान पोस्ट्स कश्या काय वाचायला मिळाल्या असत्या? :-)

सर्किट said...

एका नव्या ’स्पिन द यार्न’ मध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केले जात आहे. लेखनात भाग घेण्यासाठी, फ़क्त वाचायला नाही काही. :)
http://sty-mar1.blogspot.com/

Shraddha said...

हाय यशोधरा,

ब्लॉगसाठी स्वत:चं नवीन बारसं केलंस की काय? :-P
ब्लॉग वाचला, चांगलं लिहितेस. बर्‍याच पोस्ट्स एकसलग वाचल्याने कॉमेंट्स एकत्रच देतेय.

मराठीचिये पाईंका वक्र पाहे.... <<<<
यात तू लिहिलंयस ना की राष्ट्रभाषा येत नाही वगैरे... तर हिंदी ही खरोखरच राष्ट्रभाषा नाहीये. ती आपल्या घटनेत दिलेल्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. आपल्या घटनेत कुठेही 'राष्ट्रभाषा' ही संकल्पना नाही. घटना नेटवर उपलब्ध आहे त्यात ही माहिती ताडून बघता येईल.
विषयांतराबद्दल क्षमस्व. पण हे आवर्जून सांगावेसे वाटले.

सुमल्याची आश्रमवारी <<<<<
सही सुरू आहे. पुढच्या भागांची वाट बघतेय. भाषेचा बाज मस्त सांभाळला आहेस.

असंच नियमित लिहीत जा. :-)

Yashodhara said...

श्र, बारस नाही, कात टाकली!! :D, :P तसही मी काढलेले फोटो आहेतच इथे, माझी ओळख पटवून द्यायला.

ब्लॉग वाचून अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद. मीही आज नेटवर जाऊन पाहिल, की आपल्या देशाला राष्ट्रभाषाच नाही!! हं!! का?? कोण जाणे?? इतक्या भाषा बोलल्या जातात, त्यात कोणत्या भाषेला, प्रांताला, समूहाला झुकत माप दिल, अस वाटू नये म्हणून का?? सगळीकडेच आपण बोटचेप धोरण का स्वीकारतो, कोणास ठाऊक....पण त्याचबरोबर 'हिंदी' ही शासकीय कारभारासाठीची ऑफ़िशियल भाषा आहे म्हणे... असो. इथे मला ही चर्चा अपेक्षित नाही. :)

आणि मालवणी भाषेचा बाज माझ्या रक्तातच आहे :) परत एकद धन्यवाद.

Yashodhara said...

सर्किट, अभिजित धन्यवाद :)
आणि सर्किट, STY मधे भाग घ्यायला हो म्हटलय खर, कितपत जमेल, जरा धाकधूकच आहे मला....