December 1, 2007

गूढ अशा एकांती

या गूढ अशा एकांती,
मज तुझी आठवण येते,
मी परत एकदा जगते,
क्षण सारे तुझे न माझे

नजरेची जगलो भाषा,
स्पर्शांची होती गाणी,
ती अनवट वेडी धुंद,
जी अजून वेढूनी राही

तू दूर आता, जणू स्वप्न,
माझ्या आकाशीचा चंद्र,
जो असून गवसत नाही,
तरी संगत अक्षय आहे

या गूढ अशा एकांती,
मग तुझी आठवण येते......

2 comments:

Abhijit Dharmadhikari said...

"माझ्या आकाशीचा चंद्र,
जो असून गवसत नाही,"...

खूप छान ओळी आहेत:-)

आशा जोगळेकर said...

विरहाचा सुंदर आविष्कार !

जौ असून गवसत नाही
तरी संगत अक्षय आहे .
सुंदर भाव.